जळगांव (प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना आणि उद्योजकांना प्रोत्साहन देण्याबाबत आणि त्यांच्या समस्या संदर्भात महत्वाची बैठक आज मुंबई येथे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जळगांव औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना पाण्याच्या व विजेच्या अनेक सोई सुविधा पुरविण्या बाबत देखील आज या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या सर्व सुविधा पुरवून आणि या उद्योगातून जळगांव जिल्हयात कसा जास्तीत जास्त रोजगार निर्माण करता येईल या विषयी चर्चा करण्यात आली.
यावेळी या बैठकीला जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा), उद्योग प्रधान सचिव मंत्रालय मुंबई, ऊर्जा प्रधान सचिव, कामगार प्रधान सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी म. औ. वि. म. मुंबई, महावितरण चे व्यवस्थापकीय संचालक, जळगांव चे जिल्हाधिकारी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योग विभाग सह सचिव, श्री ललित गांधी, जिल्ह्यातील व्यापारी बंधू, आदी मान्यवर उपस्थित होते.