पहूर ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यातील एका गावात ३३ वर्षीय महिलेला शिवीगाळ, मारहण करून जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची घटना घडली पहूर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
जामनेर तालुक्यातील एका गावात ३३ वर्षीय महिला कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ९ जुलै रोजी दुपारी महिला शौचाला जात असतांना गावातील सचिन सुदाम लोखंडे हा महिलेच्या मागे मोटारसायकलने येवून मोठ मोठ्याने हार्न वाजवित होता. नंतर जवळ येवून तिचा हात पकडून विनयभंग केला. दरम्यान हा प्रकार महिलेने सचिन लोखंडेच्या घरी सांगितला असता सचिनचे भाऊ जितेंद्र लोखंडे, संजय लोखंडे आणि आई सुसाबाई लोखंडे यांनी महिलेला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने घडलेल्या प्रकारानंतर पहूर पोलीस ठाण्याततक्रार दिली. या तक्रारीवरून सचिन लोखंडे, जितेंद्र लोखंडे, संजय लोखंडे आणि सुसाबाई लोखंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना किरण शिंपी करीत आहेत.