अमळने ( प्रतिनिधी ) – गांधलीपूरा भागातून अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचे समोर आले आहे. अमळनेर पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गांधलीपूरा भागात १७ वर्षीय मुलगी कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ९ जुलै रोजी सकाळी मुलीची आई व भाऊ कामाला निघून गेले. त्यावेळी मुलगी घरात एकटीच होती. दुपारी मुलीचा भाऊ ३ वाजता कामावरून घरी आला तेव्हा त्याला त्याची बाहिण दिसली नाही. त्याने मामा व आजी यांच्या घरी जावून तपास केला असता मुलगी आली नसल्याचे सांगितले. सर्वत्र तिचा शोध घेतला परंतू अल्पवयीन मुलगी कुठेही आढळून आली नाही. अखेर १० जुलै रोजी दुपारी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना कैलास पवार करीत आहेत.