जळगाव (प्रतिनिधी) – इंडियन मेडिकल असोसिएशन संस्थेच्या अंतर्गत डॉक्टरांच्या बॉक्स क्रिकेट स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये अरुश्री वॉरियर्सने अंतिम सामन्यात विजय मिळवून आयएमए बॉक्स क्रिकेट चषक पटकावला.
क्रिकेट स्पर्धा ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यातील 12 संघांनी सहभाग घेतला यात अमळनेर ,चोपडा ,जामनेर संघानीही सहभाग नोंदवला. अंतिम सामन्यामध्ये डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या अरुश्री वॉरियर्सने विनोद हॉस्पिटलचा पराभव केला.
विजयी संघाचे कौतुक आय एम ए बाँक्स क्रिकेट आयोजक आयएमए अध्यक्ष डॉ. दीपक आठवले, सचिव डॉ. जितेंद्र कोलहे, स्पोर्ट्स चेअरमन डॉ. वृशाली पाटील, स्पोर्ट्स सेक्रेटरी डॉ. मनीष चौधरी यांच्यासह आय एम ए महाराष्ट्र राज्य पदाधिकारी डॉ.अनिल पाटिल , स्नेहल फेगडे.
जळगाव आय एम ए तर्फे डॉ. विलास भोळे, डॉ.सुशील कुमार राणे, डॉ. सचिन देशमुख, डॉ. शाहिद खान, डॉ. संजय पाटील, डॉ. संदीप पाटील आदींनी अभिनंदन केले.
विजयी संघाचे नेतृत्व रवी कुकरेजा यांनी केले. संघामधे निलेश राठी , चेतन काकलीया, ललित पाटिल, संदिप पाटिल, अनिस शेख, नितिन विसपुते, भुषण चोपडे, रविंद्र पाटिल, विपुला पाटिल, सुवर्णा पाटिल यांचा सहभाग होता.