जळगाव सायबर क्राईम विभागात गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) -जळगाव येथील पत्रकार साप्ताहिक केसरीराज चे संपादक भगवान सोनार यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने तयार केलेल्या फेसबुक खात्यावरून पैशांची मागणी होत आहे ही बाब प्रत्यक्ष संपर्कात असलेल्या आणि फेसबुकवरही मित्र असलेल्या परिचितांनी लक्षात आणून दिल्यानंतर भगवान सोनार यांच्या फिर्यादीवरून जळगाव पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे .
भगवान सोनार यांच्या मूळ फेसबुक खात्यातील ८५ मित्र या बनावट खात्यातही जोडले गेलेले दिसत असल्याने सर्वच मित्र, नातेवाईक, व्यावसायिक हितचिंतकांना ते बनावट खाते असल्याबद्दल शंका कदाचित येणारही नाही आणि त्यामुळे मोठी फसवणूक होऊ शकते . या बनावट खात्यावर मूळ खात्यावरील काही छायाचित्रेही दिसत असल्याने कुणाला शंका येणार नाही अशी हातचलाखी या अज्ञात आरोपीने केलेली आहे . मेसेंजरवर चॅटिंग करून या अज्ञात व्यक्तीकडून भगवान सोनार यांच्या परिचितांकडे फेसबुक मँसेजर वरुन पैशांची मागणी केली जात आहे . हा अज्ञात आरोपी मॅसेंजरवर चॅटिंग करताना हिंदी भाषेत बोलतो . आणि एरवी भगवान सोनार मराठी बोलतात . त्यांचे नेहमीचे संभाषण मराठीमधूनच होत असते . हा फरक लक्षात आल्यावर निळकंठ सोनार व अमोल सोनार या मित्रांनी हा बनावट फेसबुक खात्याचा भंडाफोड केल्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
बनावट फेसबुक खात्यावर भगवान सोनार यांच्या नावाचा उल्लेख भगवान सुणार असा दिसतो . त्यामुळे मित्र, नातेवाईक आणि हितचिंतकांनी दक्षता घ्यावी असे ते म्हणाले.







