पुतळा लवकरात लवकर बसवण्यात यावा असे मागणीचे शिवसेनेचे निवेदन
यावल (प्रतिनिधी) – अखंड हिंदू समाजाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लवकरात लवकर बसवण्यात यावा असे मागणीचे निवेदन शिवसेना यांनी आज दि.११ मंगळवार रोजी तहसिलदार जितेंद्र कुवर यांना देण्यात आले.
निवेदना नुसार अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा बेळगाव (कर्नाटक ) प्रांतातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्थापित केलेला पुतळा स्थानिक प्रशासनाने व सरकारने कोणतीही पुर्वसुचना न देता मध्यरात्री हटवण्यात आला आहे. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील व शिवप्रेमीनमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तरी सदरील पुतळा लवकरात लवकर बसवण्यात यावा. हि सर्व शिवसैनीकांची व शिवप्रेमींची इच्छा आहे. असे मागणीचे निवेदन शिवसेना यांनी तहसिलदार जितेंद्र कुवर यांना देण्यात आले.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे , शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले , शिवसेना आदिवासी सेल तालुका प्रमुख हुसेन तडवी , युवासेना शहर अधिकारी सागर देवांग , युवासेना तालुका सरचिटणिस सचिन कोळी, अल्पसंख्यांक तालुका संघटक अजहर खाटीक , युवासेना शहर समन्वयक सागर बोरसे , युवासेना शहर सरचिटणीस विजय पंडित , शिवसेना विभाग प्रमुख योगेश पाटील, सुरेश कुंभार सह शिवसेना , युवासेना व आदिवासी सेल पदाधिकारी , कार्यकर्ते यांची स्वाक्षरी व उपस्थित होते.







