जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा महीला काँगेस अध्यक्षा सुलोचना वाघ यानी कोरोना काळात. अनेक प्रकारातुन आपले, समाजाप्रती अनेक कार्य केले. गोरगरीब लोकांसाठी व महीला बचत गटासाठी आपल्या भुमिकेतुन अतोनाथ हालाकीचे जिवन जगणाऱ्या महीलासाठी कोरोना काळात सुलोचना वाघ यांनी आपल्या जिवाची व आपल्या परीवाराची कसलीही परवा न करता समाजकार्यात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.
तसेच या कामात मा.खा. डॉ.उल्हास पाटील, गोदावरी फाउंडेशन जळगाव यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. याबद्दल कोरोना यौध्दा सन्मानपत्र देऊन सुलोचना वाघ याना यांना गौरविण्यात आले. यावेळी अमळनेर तालुका सरचिटणिस सतोष पाटील व अमळनेर तालुका काँग्रेसतर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.