नगरदेवळा (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावात आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या कोरोना योद्धांचा गौरव तसेच डॉ.भूषण मगर फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा येथील पाटील समाज मंगल कार्यालयात सोशल डीस्टनसिंग चे पालन करत करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यानंतर डॉ.भूषण मगर फाऊंडेशनचे फलक अनावरण डॉ.भूषण मगर यांनी केले.त्यांचा सत्कार गणेश तावडे यांनी केला . यावेळी व्यासपीठावर देविदास सावळे ,डॉ. जे. डी. काटकर, डॉ.अभय राजपूत, सौ.आशा दराडे, डॉ. विजय पाटील , पो.हे.को.कैलास पाटील उपस्थित होते .

डॉ.भूषण मगर यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसार याविषयी चिंता व्यक्त केली तसेच सर्वांना सुरक्षित राहून योग्य आहार , व्यायाम,सोशल डीस्टनसिंगचे पालन करणे व आपल्या मनात आत्मविश्वास जागृत करून कोरोना शी सामना कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले .तसेच या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या सर्व घटकांची त्यांनी स्तुती केली. यावेळी डॉक्टर ,मेडीकल , अंगणवाडी सेविका ,आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका , पोलीस प्रशासन,पत्रकार बांधव या सर्व कोरोना योद्धांचा पुष्प व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. पी. बावस्कर यांनी केले. तर प्रास्ताविक व आभाप्रदर्शन सौरभ तोष्णीवाल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रविंद्र महाजन ,निलेश पाटील ,उमेश तावडे, शुभम पाटील तसेच डॉ.भूषण मगर फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.







