नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये कलशयात्रा काढण्यात आली. या यात्रेत कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांना केराची टोपली दाखवण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी भाजच्या जिल्हाधिक्षांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
इंदूर ही कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. असे असले तरी स्थानिक नेते आणि नागरिकांनी याचे गांभीर्य कळालेले नाही. त्यांनी मोठ्या प्रमाणात कलश यात्रा काधली होती. या प्रकरणी पोलिसांनी 10 जणांविरोधात कारवाई केली आहे. या कलश यात्रेत मोठ्या प्रमाणात लोक सामील झाले होते. त्यात महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. खुप सार्या महिला डोक्यावर कलश घेऊन जाताना व्हायरल फोटोंमध्ये दिसत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सोनकर, भगवान सिंह, सुभाषण चौधरी आणि विनोद चंदानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.