जळगाव (प्रतिनिधी) – ए. व्ही. जी. फिल्म्स अँड प्रोडक्शन आणि शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या राज्य भरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या फेसबुक लाईव्ह राज्यस्तरीय चर्चेमध्ये आज राज्यात शैक्षणिक सामाजिक साहित्यिक पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आणि विविध क्षेत्रातील युवक व सर्वस्तरीय चांगल्या उपक्रमांना सतत प्रेरणा देणारे सर्जनशील व्यक्तिमत्व जळगाव जिल्ह्यात आदिवासी वस्तीवर जाऊन कोरोना काळात घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी उपक्रम राबवून हा अनुकरणीय उपक्रम सर्वाँचा आवडीचा बनविणारे राज्यशासनद्वारे देण्यात येणाऱ्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी आणि जिल्हा परिषद जळगाव आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी किशोर पाटील कुंझरकर यांना आपली माणसं आपली चर्चा उपक्रमांतर्गत आज संकट काळातील माझा चाकोरीबाहेरील प्रयोग आणि शिक्षणातील सर्वांत पुढील आव्हाने या विषयावर संवाद साधण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मान्यवरांच्या फेसबुक ऑनलाईन चर्चेमध्ये आज गुरुवार 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता ते सर्वांशी सुसंवाद साधणार आहेत