निभोरा (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील सुलवाडी येथे दि.10 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली असता.यावेळी पाऊस सुरु असतांना कडाडून वीज पडल्याने एका महिलेचा या घटनेत मृत्यू झाल्याची घटना घडली.
यावेळी परिसरात खळबळ उडाली आहे.
गुरुवारी रावेर तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली.रावेर तालुक्यातील सुलवाडी येथे गट नं-११९ मधील शेतात आशाबाई राजेंद्र महानुभव (वय-३२) ही महिला काम करत असताना त्याच्या अंगावर अचानक वीज पडल्याने ती महिला मृत्यूमुखी पडली. तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी घटनेबाबत दुजोरा दिला आहे.याप्रकरणी निंभोरा पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.