राष्ट्रवादी महिला सेलच्या वंदना चौधरी यांचा आरोप

जामनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील देऊळगांव गृप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणार्या पळासखेडा काकर येथील सोयी-सुवीधेकडे ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप राष्द्रवादी महीला कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव वंदनाबाई चौधरी यांनी केला. निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परीषदेत केला.
गेल्या अनेक दिवसांपासुन गृप ग्रामपंचायतीच्या अख्त्यारीत येणार्या पळासखेडा काकर मधील ग्रामस्थांनी श्रीमती चौधरी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या,त्या तक्रारींची दखल घेऊन त्या स्वतः काही कार्यकर्त्यासोबत पळासखेडा काकर येथे जाऊन प्रत्यक्ष पहाणी केली. तेथे सांडपाण्यासाठीच्या गटारींची सुवीधा तर नाहीच शिवाय स्वच्छतेचा मोठा अभाव असुन पिण्याचे पाण्याची पाइपलाइनचे व्हॉल्व आणि गटार यात फरकच समजत नव्हता.रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झालेली आहे.जिल्हा परिषदेच्या आवारातील गट्टू बसविलेले दाखविले पण अस्तित्वात नाही. स्मशानभूमीचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. सर्व योजना कागदांवर झाल्या की काय असा प्रश्न उपस्थित झाला. देऊळगांव ग्रुप ग्रामपंचायतिचा भोंगळ कारभार बद्दल तेथील ग्रामसथांनी व्यथा श्रीमती चौधरी यांच्याकडे मांडल्या. चौदाव्या वित्त आयोगचे पैसे फक्त कागदोपत्री आहेत. प्रत्यक्षात काहीच नाही शाळेत गट्टू बसविले नाहीत. स्मशानभूमी अपूर्ण अवस्थेत आहे, कुठल्याही योजनेचा लाभ अजूनपर्यंत मिळाला नाही. एकही ग्रामसभा अद्याप झालेली नाही. अनुसूचित जाती, जमातीच्या एकही योजनेचा लाभ संबंधित लाभार्थ्यांना मिळाला नाही. या कोरोना संकटातही संबंधीत ग्रामपंचायत या आदीवासी बहुल गावाकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करीत असल्याचेही त्यांनी सांगीतले.यावरील मुद्यावर वंदना चौधरी यांनी गटविकास अधिकारी श्रीमती कवडदेवी यांची भेट घेऊन तेथील समस्यांबाबत लेखी तक्रार वजा निवेदन सादर केले.







