• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बिहारमध्ये सुरुवातीच्या कलानुसार शिवसेनेची कामगिरी समाधानकारक नसल्याचं चित्र

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 10, 2020
in भारत
0

पटना (वृत्तसंस्था) – बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. भाजप-जेडीयू यांची एनडीए बिहारमध्ये मुसंडी मारताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलानुसार शिवसेनेची कामगिरी समाधानकारक नसल्याचं चित्र आहे. 23 पैकी 21 जागांवर तर शिवसेनेच्या वाट्याला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात शिवसेना हिरीरीने उतरली होती. मात्र सेनेला मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे. कारण शिवसेनेच्या ‘तुतारी वाजवणारा मावळा’ या चिन्हासमोरील बटणापेक्षा मतदारांनी ‘नोटा’चे बटण अधिक दाबले आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना o.o4 टक्के मतं मिळाल्याचं सुरुवातीच्या मतमोजणीत दिसत होतं.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार दुपारी 1.45 वाजेपर्यंत आलेल्या निकालाच्या कलांनुसार शिवसेनेला 23 पैकी 21 जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. शिवसेनेने 50 उमेदवार देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात 23 जागांवरच निवडणूक लढवली.

विशेष म्हणजे राजदचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या तेजस्वी यादव यांच्या राघोपूर मतदारसंघातही शिवसेना डेंजर झोनमध्ये आहे. म्हणजेच शिवसेनेच्या बहुतांश उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे.

कोणत्या मतदारसंघात शिवसेना डेंजर झोनमध्ये?
पालिगंज, गया शहर, वझीरगंज,चिरैया,मानेर,फुलपरेश,राघोपूर,बेनिपूर,मधुबनी,तरैया,अस्तवा,औरिया,कल्याणपूर,बानमंखी,ठाकूरगंज,समस्तीपूर,सराई,
मोरवा,किशनगंज,बहादूरगंज,नरपतगंज,मनिहारी

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेला आधी बिस्कीट हे चिन्ह दिले होते. त्यावर शिवसेनेने तीव्र नापसंती व्यक्त करत चिन्ह बदलून द्यावं अशी मागणी केली होती. ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह देण्यात यावे, असे शिवसेनेने निवडणूक आयोगाला सुचवले होते. पण ही तिन्ही चिन्हं आधीच अन्य काही उमेदवारांनी आरक्षित केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किटाऐवजी तुतारी वाजवणारा मावळा हे निवडणूक चिन्हं बदलून दिलं.

नितीश कुमार यांच्याने शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर आक्षेप घेतला होता. जेडीयूची निशाणी बाण आहे. शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चाची निशाणी धनुष्यबाण असल्याने मतदारांचा गोंधळ होतो असा JDU चा आक्षेपचा मुद्दा होता. निवडणूक आयोगाने जेडीयूचा आक्षेप ग्राह्य मानत शिवसेनेला धनुष्य बाण चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही, असे कळवले होते. त्यानुसार सेनेला तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्हं मिळालं आहे.

2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेची कामगिरी

शिवसेनेने लढवलेल्या एकूण जागा – 80/243
एकूण मिळालेली मते – 2 लाख 11 हजार 131
तिसऱ्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 07 (जमालपूर, कुम्हरार, पटनासाहिब, मोरवा, हयाघाट, दिनारा, बोचहा)
चौथ्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 02 (भमुआ, मनिहारी)
पाचव्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 01 (बलरामपूर)
एकूण 35 जागांवर शिवसेनेला भाजपपेक्षा अधिक मतं मिळाली होती. यापैकी तीन जागांवर शिवसेनेने घेतलेल्या निर्णायक मतांमुळे भाजप उमेदवार पराभूत झाले होते.
शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम पक्षापेक्षा अधिक मतं मिळाली होती (राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली मतं – 1 लाख 85 हजार 437, एमआयएमला मिळालेली मतं – 80 हजार 248)


 

 

Previous Post

विद्यार्थिनीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार करीत जीवे ठार मारले

Next Post

मनपाच्या उपमहापौर पदासाठी सुनील खडके यांचा अर्ज दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मनपाच्या उपमहापौर पदासाठी सुनील खडके यांचा अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon