जळगाव (प्रतिनिधी) – परमात्मा मोठे आहे. चरित्र माणसाचा अहंकार दूर करते आपण कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येक जीवाला कुठे ना कुठे अहंकार आहे. हा अहंकार मनुष्याच्या नाशाला कारणीभूत ठरतो.असे रामनवमी निमित्ताने कीर्तनातून ह.भ.प.देवदत्त मोरदे महाराज यांनी सांगितले.
रेल्वे कॉलनीतील सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या परिसरात रामनवमी निमित्ताने देवदत्त मोरदे महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. मोरदे महाराजांनी रामाचे चरित्राचे वर्णन करून उपदेश दिला की माणसाने आपल्यातला रामाला जिवंत करावा. राम हे मर्यादापुरुषोत्तम होते पण आजच्या माणसाला कुठलीच मर्यादा राहिलेली नाही आपण दुसरे सगळे सण साजरे करतो पण रामनवमी लवकर कोणी साजरी करत नाही सगळ्यांनी रामनवमी पण सणासारखी साजरी करावी असा उपदेश त्यांनी भाविकांना दिला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोहर गचके गुरुजी, रुपेश झवर , सुनिता गांगुर्डे , सतीश सोमानी, सुनिता सातपुते, सिद्धिविनायक सखी मंडळ, मनोहर अमृतकर, चंद्रकांत चौधरी , रुपेश माळी, हर्षल सातपुते, लखीचंद जैन , महेश वाणी, राहुल पाटील व परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले.