पाचोरा ( प्रतिनिधी ) – प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या भाजप नेत्या नूपुर शर्मा व नविन जिंदाल यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आज पाचोरा येथील मुस्लिम समाजाने नायब तहसिलदार संभाजी पाटील व पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली
भाजप नेत्या नुपूर शर्मा व नविन जिंदाल यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी अपशब्द वापरले. यामुळे संपूर्ण जगातील मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
निवेदन देतांना अज़हर खान, जय वाघ, रसुल शेख, रफिक बागवान, अय्युब बागवान, अज़हर खान मोतीवाले, शकुर बागवान, सत्तार पिंजारी, मुख्तार शाह, मुस्लिम बागवान, अनिस खान , रहीम बागवान ,, हारुन बागवान, वसीम बागवान, मोहसीन खान , सईद शेख शब्बीर शेख, मुफ्ती इसरार, मौलाना अल्ताफ, हाफिज़ जहुर खान, शाकीर बागवान, रऊफ शाह, मोहम्मद लखारी, निसार पिंजारी, शफीयोद्दीन पिंजारी, मतीन बागवान, आकीब शेख , आबीद खान, डॉ झाकीर देशमुख, गफ्फार सैय्यद, आरीॆफ ठेकेदार, अकरम कुरैशी, जावेद कुरैशी, मुजाहीद खाटीक, रउफ टकारी, नाज़ीम हाजी, तारीक सैय्यद, डॉ अकील शेख, आदी उपस्थित होते.