जिल्हा सहकारी बोर्डाचा 85 वा वर्धापन दिन उत्साहात
जळगाव ( प्रतिनिधी ) – कोणत्याही सहकारी संस्थेचे नेतृत्व चांगले , पारदर्शी असेल तर संस्थेची भरभराट निश्चित आहे. सहकार विभागाकडून देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांच्या कामात सुसूत्रता येते आणि यातूनही चांगले नेतृत्व उदयास येते, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी आज केले. जिल्हा सहकारी बोर्डाच्या 85 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा उपनिबंधक सुनील बिडवई होते. यावेळी जिल्हा बँकेचे एमडी जितेंद्र देशमुख, जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, उपाध्यक्ष सतीश शिंदे, , देशमुख, श्रीराम पाटील, हेमंतकुमार साळुंखे, प्रेमानंद पाटील, नाना पाटील, सुधीर तराळ, शिवाजीराव ढोले पाटील, प्रवीण गुजराती, डॉ वसंतराव देशमुख, श्रीराम पाटील, संजय पाटील, प्रतिक्षा काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बिडवई यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सहकार चळवळीत बोर्डाचा मोठा वाटा असून, कलम 24 नुसार सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. हे प्रशिक्षण सक्तीचे असून सर्व संस्थांनी कर्मचाऱ्यांना ते देणे बंधनकारक आहे. बोर्डाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी जिल्हा सहकारी बोर्डाचा 85 वर्षाचा आढावा घेतला.
व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बोर्डाचे संचालक सुदाम पाटील यांनी सूत्रसंचालन केले, प्रास्ताविक प्रा. संदांशिव यांनी केले, तर आभार प्रदर्शन बोर्डाचे उपाध्यक्ष सतीश शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बोर्डाचे सहल शिक्षणाधिकारी आर बी पवार, ए सी बाविस्कर जी एस साळुंखे व जितेंद्र सुर्वे यांनी सहकार्य केले.