युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्री (राज्य) रक्षाताई खडसे यांची उपस्थीती
जळगाव(प्रतिनिधी) :- मेरा युवा भारत केंद्र, जळगाव यांच्या वतीने एक पेड माँ के नाम या उपक्रमात गोदावरी व डॉ केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाच्या १०० विदयार्थ्यांसह केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे यांनी उपस्थीती दिली.
चोरवड, भुसावळ येथे आयोजित या उपक्रमात गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव व डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालय, जळगाव येथून एकूण १०० विद्यार्थी व शिक्षकवृंदांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.या कार्यक्रमाचे आयोजन मा. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्री (राज्य) श्री. रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धन व जनजागृती हा या अभियानाचा उद्देश होता. विद्यार्थ्यांनी मातृप्रेमाची जाणीव जपत झाडे लावून सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले.महाविद्यालयीन प्रतिनिधींच्या उपस्थितीत विद्यार्थीनींनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी दिलेले योगदान उल्लेखनीय ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मेरा युवा भारत केंद्र व जिल्हा प्रशासनाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.