• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गट तट बाजूला सारून एकदिलाने काम करावे – गृहमंत्री अनिल देशमुख

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 1, 2020
in जळगाव
0

कोणतीही निवडणूक आली त्यात राष्ट्रवादीचा झेंडा रोवला गेला पाहिजे- एकनाथराव खडसे

शहादा (नंदुरबार) (प्रतिनिधी) – जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची पुन्हा पायाभरणी करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. गट तट बाजूला सारून एकदिलाने काम करून एक ध्येय निश्चित ठेवल्यास जिल्ह्यात चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही; असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी शहादा येथे पक्षाच्या आढावा बैठकीत केले.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख शहादा दौऱ्यावर आले असता लोणखेडा येथील पाटीदार मंगल कार्यालयात राष्ट्रवादीतर्फे आयोजित पक्षाच्‍या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे, माजी आमदार उदेसिंग पाडवी, नरेंद्र पाडवी, कार्याध्यक्ष सागर तांबोळी, राष्ट्रवादीचा महिला जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे, किरण शिंदे, नगरसेवक इक्बाल शेख, सागर तांबोळी, कमलेश चौधरी, जकीरमिया जहागीरदार, अमृत लोहार,शांतीलाल साळी, चंद्रकांत पाटील, एन. डी. पाटील, सुरेंद्र कुवर, नितीन पाडवी, ॲड.अश्विनी जोशी, पुष्पा गावित, रविंद्र मुसळदे, अलका जोंधळे, दीपा पाटील, नवनवीन पवार, सुभाष शेमळे, सुरेखा वाघ, जगदीश वाघ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, की नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु कालांतराने काहींनी पक्षांतर केल्याने सध्या राष्ट्रवादीची अवस्था जरी कमी असली तरी पक्षातल्‍या शिलेदारांनी पक्ष मजबुतीसाठी एकदिलाने काम केल्यास जिल्ह्यात चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. एकनाथराव खडसे यांचा फायदा महाराष्ट्रात होणार आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे पक्षाला ताकत मिळणार आहे. खान्देशात त्यांच्यामुळे वेगळेच चित्र निर्माण होणार आहे. कोरोनाच्या काळात शासनाच्या निर्देशाचे नागरिकांनी पालन केल्यास कोरोनाला हद्दपार करू शकतो. यासाठी नागरिकांनी शासनाने केलेले निर्देशांचे पालन करावे असे आवाहन करून जिल्ह्यातील चित्र बदलण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन त्‍यांनी केले.

कोणतीही निवडणूक आली त्यात राष्ट्रवादीचा झेंडा रोवला गेला पाहिजे- एकनाथराव खडसे
खडसे म्हणाले, की नंदुरबार जिल्ह्यावर काँग्रेसचे प्रभुत्व कायम राहिले. जिल्ह्यातील एकही गाव असे नाही; जिथे नाथाभाऊ पोहोचला नाही. गेल्या काळात पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. जंगलात मुक्काम केला, कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवल्या. जिल्ह्याचा पूर्ण अभ्यास आहे. नंदूरबार जिल्ह्यात पक्ष केंद्रीत राजकारण नसून व्यक्तिकेंद्रीत राजकारण आहे. पक्षापेक्षा व्यक्तीला जास्त महत्त्व आहे. डॉ. विजयकुमार गावित व खासदार डॉ. हिना गावित यांना भाजपात त्यावेळी मीच आणले. सर्वांनी एकदिलाने काम करून पक्ष मजबूत करायचा आहे. गट तट विसरुन कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवा व पक्षाची नव्याने बांधणी करा असा सल्लाही यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. यापुढील कोणतीही निवडणूक आली त्यात राष्ट्रवादीचा झेंडा रोवला गेला पाहिजे. पक्षात अनेक जण येण्यास इच्छुक आहेत. परंतु सध्याच्या पक्षांतर बंदी कायद्यामुळे अडचण येत आहे. भविष्यात या भागात मोठा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेश निश्चित करू. गेल्या चाळीस वर्षात भाजपा वाढवली अनेक मान अपमान सहन केलेत आता त्यांचे उटणे काढण्याची वेळ आली आहे.


 

 

Previous Post

भुसावळातून मोटार सायकल चोर बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

भुसावळच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पुन्हा नॉन कोविड रूग्णसेवा सुरू करा : डॉ. निलेश पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुसावळच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पुन्हा नॉन कोविड रूग्णसेवा सुरू करा : डॉ. निलेश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न

June 20, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

आदिवासी भागातील विकासकामांची सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी

June 20, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

निलेश खलसे (बारी) यांचे ‘लॉ’ पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश

June 20, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!

June 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न

June 20, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!

आदिवासी भागातील विकासकामांची सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी

June 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon