मुंबई (वृत्तसंस्था) – संपूर्ण देशासह राज्यात देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही चिंताजनक रित्या वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील आरोग्य यंत्रणा जीवाची बाजी लावून काम करत आहे. अशातच काही दानशूर व्यक्ती महाराष्ट्राच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. भारतरत्न लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी तब्बल सात लाखांची मदत देऊ केली आहे.
covid-19 च्या काळात मुख्य मंत्री सहाय्यता निधीसाठी सात लाख रुपयांची मदत लता मंगेशकर यांनी केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. कोविड 19 विरुद्धच्या लढाईत राज्य शासनाने आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यासाठी covid-19 मुख्यमंत्री सहाय्यता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे.







