चोपडा ( प्रतिनिधी ) – येथे बँकेतून पैसे काढणारी व्यक्ती मोटारसायकलने घरी जाण्याच्या तयारीत असतांना. दोन अज्ञात भामट्यांनी तुमच्या मानेवर मुंग्या आहेत. असे सांगून लक्ष विचलीत करून पाच लाखांची रोकड ठेवलेली पिशवी लंपास केली आहे. चोपड़ा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केशरलाल मोतीलाल पाटील (वय ४५) हे गरताड येथे कुटुंबियासह वास्तव्याला आहे. मंगळवारी सायंकाळी ते चोपडा शहरातील एसबीआय बँकेत आले. त्यांनी चेकद्वारे त्यांच्या खात्यातून ५ लाख रूपये काढून त्यांच्याजवळ कापडी पिशवीत ठेवले पैसे घेवून बँकेबाहेर त्यांच्या मोटारसायकलजवळ उभे असतांना दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी तुमच्या मानेवर मुंग्या आहेत असे सांगून केशरलाल पाटील यांना पाण्याचा जग दिला केशरलाल पाटील मानेवर पाणी टाकत असतांना लक्ष विचलित करून अज्ञातांनी त्यांच्या हातातील ५ लाख रूपयांची पिशवी घेवून त्यांच्या मोटारसायकलवरून पसार झाले. पाच लाख रूपयांची पिशवी लंपास केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. परंतू तोपर्यंत दोन्ही भामटे पसार होण्यास यशस्वी झाले. केशरलाल पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपड़ा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सपोनि अजीत सावळे करीत आहेत.