जळगांव (प्रतिनिधी ) – महावितरणचे मानव संसाधन व्यवस्थापक उद्धव कडवे यांनी कंत्राटी काम करणाऱ्या तरुणीशी गैरवर्तन केल्याने महावितरणच्या कामगार संघटनांनी निषेध नोंदविला. कडवे यांच्या तातडीने निलंबनाची मागणीही केली. प्रशासनाने तातडीने कारवाईसाठी कामगार संघटनांच्या कृती समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी एमआयडीसीतील कार्यालयासमोर निदर्शनेही केली.
पीडित तरुणीने उद्धव कडवे यांनी केलेल्या गैरकृत्याविषयी मुख्य अभियंत्याकडे तक्रार करूनही, अद्याप कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. ही तरुणी कंत्राटी असल्याने पीडितेला कामावर कमी करून, कारवाई केलेली नाही.यामुळे महावितरणमध्ये कायम महिला कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे आहे. विशाखा समितीतर्फे चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून अहवाल मिळाल्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल असे सहाय्यक महाव्यवस्थापक नेमिलाल राठोड यांनी सांगितले.
कारवाई न झाल्यास कामगार कृती समितीतर्फे प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनचा इशाराही कृती समितीमधील बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगार संघटना, सब-ऑर्डिनेट इंजिनिअर असोसिएशन, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, वीज तांत्रिक कर्मचारी संघटना, विद्युत ऑपरेटर्स संघटना यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.