जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीच्या दिवशीच पेन्शन पे ऑर्डर ( पीपीओ ) देण्याची संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . पंकज आशिया यांनी सुरु केली आहे. ३१ मे रोजी जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त होणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांना डॉ . पंकज आशिया यांचे हस्ते पेन्शन आदेश देण्यात आले .
जिल्हा परिषदेत ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या समाजकल्याण विभागातील समाजकल्याण निरीक्षक डी .एस. पाटील , महिला व बालकल्याण विभागातील कनिष्ठ सहाय्यक रवींद्र पाटील , परिचर अनिल चाटे , ग्रेडेड मुख्याध्यापक छगन पवार , उपशिक्षक गोकुळ सोनवणे , उपशिक्षक बाळकृष्ण ठोसर, वरिष्ठ सहाय्यक सुचिता भिरूड, आरोग्य सहाय्यिका कल्पना गायकवाड यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे हस्ते पेन्शन आदेश देण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमाला महिला बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत , शिक्षणधिकारी विकास पाटील, समाजकल्याण अधिकारी रायसिंग , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . बी.टी . जमादार , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . प्रमोद पांढरे , प्रशासन अधिकारी डॉ. मनोहर बावणे , कनिष्ठ प्रशासन अधिकारी अरुण बागुल , साकिब शेख , महिला बालविकास विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी अजय पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी नंदू पाटील, शिक्षण विभागाच्या सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रतिभा सुर्वे आदी उपस्थित होते . निवृत्तीच्या दिवशीच पेन्शन आदेश हातात मिळाल्याने सेवानिवृत्त कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद होता . यावेळी सेवानिवृत्त झालेले अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे , वैद्यकीय अधिकारी डॉ . मधुकर तोडसाम यांचाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.