जळगाव (प्रतिनीधी ) – महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगाव व ऋणानुबंध वधु वर परिचय मेळावा २०२३ च्या हिंदू पंचांग दिनदर्शिकेचे प्रकाशन अखिल भारतीय अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक संस्था, जळगाव येथे आज दिनांक 01 जानेवारी 2023 रोजी करण्यात आले.
प्रसंगी जळगाव शहर आमदार श्री. राजू मामा भोळे उपस्थित होते. महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव, जिल्हा जळगाव चे अध्यक्ष श्री. संजय विसपुते, उपाध्यक्ष श्री. विजय वानखेडे, नगरसेविका सौ. रंजनाताई वानखेडे, ऋणानुबंध वधु वर पालक परिचय मेळावा अध्यक्ष श्री. दीपक प्रल्हाद जाधव, श्री. कल्पेश मोहन सोनार आदी उपस्थित होते.
प्रसंगी हिंदू पंचांग दिनदर्शिकेचे प्रकाशन शहरातील अनेक सोनार समाज बांधव भगिनी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सूत्र संचलन सौ. राजश्री पगार यांनी तर आभार प्रदर्शन…
कार्यक्रम प्रसंगी अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळच्या सर्व पदाधिकारी महिला भगिनी देखील उपस्थित होत्या.