मुंबई (वृत्तसंस्था) – यंदाच्या अर्थसंकल्पाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे हा पेपरलेस अर्थसंकल्प आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा पेपरलेस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक भागात पेपरलेस वर्क वाढत आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मला मोठं महत्त्व प्राप्त होत आहे. त्याचवेळी Budget 2021-22 मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जनगणनेसंदर्भात मोठी घोषणा केली.

अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या यंदाचे वर्ष बे जनगणनेचे वर्ष असून पहिल्यांदाच जनगणना डिजिटली होणार आहे. जनगणनेसाठी 3 हजार 760 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Budget 2021 आज सादर होत आहे. या आधी सोमवारी शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजारात निर्देशांक 400 अंकांनी वधारून 46,617.95 अंकावर खुला झाला आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच निफ्टीचा कारभार 13,758.60 अंकावर सुरू झाला.







