तिनशे ग्रामस्थांनी स्वाक्षरी करुन निवेदन दिले ; बिडीओंनी दिले चौकशीचे आदेश


धानोरा (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यातील धानोरा येथे ग्रामपंचायत अंतर्गत चौदाव्या वित्त आयोगामार्फत सुरु असलेले काम नित्कृष्ट असल्याने ग्रामस्थ एकवटलेत.
याबाबत चौदा बाबी शासनाच्या निदर्शनास याव्यात यासाठी बिडीओंना निवेदन देण्यात आले.बिडीओंना तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात आले.निवेदनाच्या प्रती स्थानिक ग्रामपंचायत,आमदार,जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही देण्यात येणार असल्याची माहीती ग्रामस्थांनी दिली.
याबाबात सविस्तर असे की,तेरा हजार लोकसंख्या असलेल्या धानोरा गावात ग्रामपंचायत अंतर्गत चौदाव्या वित्त आयोगातून गावात ठिक-ठिकाणी विविध कामे होत आहे.ही कामे पूर्णतः नित्कृट होत असल्याची बाब निदर्शनास येताच ग्रामस्थ एकवटून तब्बल तिनशेवर ग्रामस्थांनी चौदा बाबी चे स्वाक्षरी केलेले निवेदन सादर केले.या निवेदनात ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वतः राहत असलेल्या गल्लीत कामे टाकून घेतली,गावात अतिक्रमण ला पाठबळ देऊन अन्यत्र कामे आखली जात आहेत, दलित वस्तीत कामे अपूर्ण, ग्रामपंचायत मार्फत ठिक-ठिकाणी झालेले कामे नित्कृष्ट, इस्टिमेट नुसार कामे होत नाहीत, ठेकेदार व ग्रामपंचायत सदस्य गावाबाहेर सभा भरुन आपला हिस्सा किती ? याबाबत चर्चा करतात.ग्रामस्थांना अनभिज्ञ ठेवून सर्रासपणे कामे होत आहेत, सदगुरु नगर मध्ये तीन वेळा काम सुरु करुन बंद पाडले, कोळी वाड्यातही नित्कृष्ट कामे झालीत.
असे अनेक बोजवारा उडालेला आहे,ज्या ठिकाणी कामे हवीत तेथे कामे नाहीत,आदिवासी वस्ती सोडून इतर ठिकाणी कामे दाखवलीत,वर्कआॕर्डर आहे की नाही तरीही कामे सुरुच आहे,गावातील ग्रामस्थांनी इस्टिमेट मागितले असता दाखवले नाही,बांधकाम अभियंता येऊन पाहणी करुन गेले तरीही काही फरक पडला नाही असे मुद्दे आहेत.
एकाच ठेकेदाराला दिले ६५ लाखाचे कामे
येथिल ग्रामपंचायत अंतर्गत चौदाव्या वित्त आयोगामार्फत अंदाजित ६५ लाख रुपयांचे कामे सरपंच पती,ग्रामपंचायत सदस्य यांनी संगनमताने एकाच ठेकेदाराला दिली असल्याने सदर कामे ग्रामपंचायत आटोपून घेत आहेत.कारण १० सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत चा कार्यकाळ संपण्यात आला आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
बिडीओंनी दिले तात्काळ चौकशीचे आदेश
सदर निवेदन हे स्थानिक पंचायत समिती सदस्या,गटविकास अधिकारी भरत कोसोदे चोपडा यांना दिले असता.त्यांनी तात्काळ एक ग्रामपंचायत विस्तार अधिकारी,नविन शाखा अभियंता यांना रितसर चौकशी करुन काम थांबवण्याचे आदेश कोसोदे यांनी दिले.यामुळे चौकशीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
सदगुरु नगरमधील काम तीन वेळा बंद व सुरु.
आम्ही काम रितसर व्हावे यासाठी सरपंच पती,ठेकेदार यांना सांगितले असता त्यांनी मनमानी करत तीन वेळा काम बंद करुन सुरु केले.आता तक्रार केली तर काम करणारच नाही असा दमही दिला. –
अमोल पाटील
राहीवाशी सदगुरु नगर.
बिडीओ भरत कोसोदे यांना धानोरा ग्रामस्थांमार्फत निवेदन देतांना.







