नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – ऑस्कर विजेते हॉलिवूड अभिनेते टॉम हँक्स व त्यांची पत्नी रिटा विल्सन यांना करोनाची लागण झाल्याची माहिती आहे. याबाबत खुद्द टॉम हँक्स यांनी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी टॉम हँक्स व त्यांची पत्नी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तिथेच त्यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.अमेरिकन सिंगर एल्विस प्रेस्लीच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे शूटिंग ऑस्ट्रेलियामध्ये सुरू आहे. यामध्ये टॉम हँक्स व्यस्त आहे. दरम्यान त्याला व त्याच्या पत्नीला करोनाची लागण झाली. टॉम हँक्सने ट्विटरच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली आहे. अभिनेत्याने म्हटले की, रिटा आणि मी येथे ऑस्ट्रेलियात करोनाने त्रस्त झालेलो आहोत. आम्हाला थोडासा थकवा जाणवत होता. तर आधीच सर्दीही झाली होती. अंगही दुखीचा त्रास होत होता. थोडा तापही आहे. यानंतर आम्ही तपासणी केली. दरम्यान आम्हाला दोघांनाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. असे टॉमने ट्विट करत सांगितले आहे.