जळगाव (प्रतिनिधी ) ;- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सावळा गोंधळ सुरु असून कोरोना काळात प्रगती योजनेसाठी १०,२०, ३० चा विषय रेंगाळला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात रात्रदिवस काम केले असले तरी त्यांच्या पदोन्नत्यांचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नसून केवळ आश्वासने देऊन वरिष्ठांकडून वेळ मारली जात असल्याचे बोलले जात आहे.
तत्कालीन सीईओ डॉ. बीएन पाटील यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडून समिती स्थापन करण्याचे सांगितले होते. मात्र अद्यापही समितीकडून ठोस कारवाई झाली नाही. आरोग्य सेवक , सहाय्यिका , पर्यवेक्षक यासह आरोग्य विभागातील अन्य कर्मचारी वर्ग गेल्या अनेक वर्षांपासून पदोन्नत्यांपासून वंचित आहे. पदोन्नत्यांबाबत प्रशासन उदासीन असल्याचे चित्र दिसून येत असून आरोग्य विभागातीलच काही कर्मचाऱ्यांकडून दिरंगाई होत असल्याचेही बोलले जात आहे. त्यातच आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असून कमी मनुष्यबळ असल्याने कामेही थंडावली आहेत. गेल्या काही वर्षांपासून आरोग्य सेवकांच्या पदोन्नत्यांचा विषय रखडला आहे.
या आहेत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या
सर्व आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यीका, आरोग्य पर्यवेक्षक, पर्यवेक्षीका या सर्व संवर्गाना १०,२०,३० वर्ष सेवा पुर्ण झालेल्याना कालबध्द् पदोन्नती मिळावी.सन १९९५ ते २००९ या कालावधीत नियुक्ती मिळालेले आरोग्य सेवक यांना २३ वर्षे होवुनही अदयापपर्यंत प्रथम कालबध्द पदोन्नती मिळालेली नाही.
मासिक वेतन (पगार) – आरोग्य कर्मचा-यांच्या वेतनासाठी काही लेखाशीर्षकाखाली अनुदान नसल्याने वेतन (पगार) नाही. (कर्मचारी यांनी त्यांचे गृह कर्ज, एल.आय.सी.कर्ज हप्ते, घरात लागणारा दुध, किराणा, भाजीपाला, घरखर्च, घरातील वयोवृदधांचे औषधी, आरोग्य सेवा देण्यासाठी त्यांना फिरस्ती करीता लागणारा खर्च, मुलांचे शिक्षण, आदी साठी लागणारा खर्च कोठुन करावा. त्याचप्रमाणे पगार उशिराने झाल्याने सोसायटी, गृह कर्ज, यांचे व्याज वाढतच असते तो भूर्दंड , हप्ता चुकला कि तो भुर्दंड हे कोठुन भरावे असा सवाल कर्मचाऱ्यांमध्ये उपस्थित होत असून याबाबत जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली आहेत.
२३ वर्ष होऊनही पदोन्नती नाही
आरोग्य कर्मचारी यांना गेल्या तीन ते चार वर्षापासुन पदोन्नती मिळालेली नाही पदोन्नती करीता तात्काळ कार्यवाही करावी अशी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून मागणी होत आहे. सर्व आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यीका, आरोग्य पर्यवेक्षक, पर्यवेक्षीका या सर्व संवर्गाना १०,२०,३० वर्ष सेवा पुर्ण झालेल्याना कालबध्द् पदोन्नती मिळावी. (सन १९९५ ते २००९ या कालावधीत नियुक्ती मिळालेले आरोग्य सेवक यांना २३ वर्षे होवुनही अदयापर्यंत प्रथम कालबध्द पदोन्नती मिळालेली नाही आरोग्य कर्मचारी यांचे वैदयकिय (बिले) देयके प्रलंबित आहेत. सेवानिवृत्त कर्मचारी कालबध्द्र पदोन्नती :- सन २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यांना कालबध्द पदोन्नती लागु करुन फरक व शासकिय गटविमा मिळावा. आरोग्य कर्मचारी हे सेवेत रुजु झाल्यापासुन तीन वर्ष सेवा पुर्ण झाल्यानंतर त्यांना लागलीच कायमपणाचे फायदे (स्थायी प्रमाणपत्र) मिळावे.