जामनेर येथील जिनियस मास्टर्स फाउंडेशनतर्फे झाला सन्मान
जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यात वाकोद केंद्रातील जि.प.शाळा वडाळी दिगर येथे पूर्वी कार्यरत असलेले व सध्या जिल्हा अंतर्गत बदलीने यावल तालुक्यातील जि.प. शाळा नागादेवी येथे रुजू झालेले संदिप पाटील यांना जामनेर येथील जिनियस मास्टर्स फाउंडेशनतर्फे दरवर्षी तालुक्यासह जिल्हाभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा “आदर्श कीर्ती” पुरस्कार २०२५ स्वामी विवेकानंद हॉल,जामनेर येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
संदिप पाटील यांनी यापूर्वी ढेकु खुर्द ता.अमळनेर,बिलवाडी ता.जळगाव या गावांमध्ये देखील सेवा केली असून विद्यार्थ्यांसाठी शाळा आपल्या दारी,दप्तरमुक्त शनिवार,पढाई पे चर्चा,स्वच्छता सन्मान, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अध्ययन उपक्रम असे एक ना अनेक विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.या उपक्रमांची दखल घेवून संदिप पाटील यांची सन २०२५ च्या “आदर्श कीर्ती” पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे जिनियस मास्टर्स फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश कांतीलाल पाटील यांनी सांगितले.
पुरस्कार प्रदान कार्यक्रम प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष(पूर्व) चंद्रकांत बाविस्कर, जि.प. उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे, नगरपरिषद जामनेर मा.गटनेते प्रशांत भोंडे,पं.स.जामनेरचे मा.सदस्य अमर पाटील,बुलढाणा जि.प.चे शिक्षण विस्तार अधिकारी नंदकिशोर शिंदे, तालुक्यातील केंद्रप्रमुख, शिक्षक,जिनियस मास्टर्स फाउंडेशन चे सर्व सदस्य व शिक्षक संघटनांचे, शिक्षक पतपेढीचे संचालक,पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.