जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या जळगाव तालुक्यात विविध गावांना भेटी
जळगाव प्रतिनिधी – जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी मंगळवार, दि. २० मे रोजी जळगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कानळदा, आव्हाने तसेच घाडी, भोलाने या गावांना भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली.
दौर्यादरम्यान त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयांची तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी केली. यावेळी ग्रामविकास योजनांची अंमलबजावणी, नोंदवही व अन्य दप्तरी कामकाज, स्वच्छता, पाणीपुरवठा व्यवस्था, औषधसाठा व आरोग्य सेवा यांची सविस्तर तपासणी केली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी भोलाने आरोग्य उपकेंद्र येथे स्वतःचा रक्तदाब देखील तेथील उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांचेकडून तपासून घेतला.
मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेवर सेवा पुरवण्याबाबत तसेच ग्रामस्थांच्या गरजा लक्षात घेऊन कामकाज अधिक प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिल्या. औषधसाठा नीट तपासून आवश्यकतेनुसार त्वरित पुरवठा सुनिश्चित करण्याचेही निर्देश दिले.
या दौर्यामुळे स्थानिक प्रशासनाला कामकाजाच्या अनुषंगाने मार्गदर्शन मिळाले असून गावांमध्ये विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.दरम्यान करनवाल यांनी जळगाव येथे रुजू झाल्यानंतर स्वागताला येणाऱ्या अभ्यागतांसाठी बुके नको, वह्या आणा हा उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमाला प्रतिसाद देत अनेक अभ्यागतांनी भेटीला येताना वह्या आणून मोठा प्रतिसाद या उपक्रमाला दिला होता.या मिळालेल्या वह्या व पेन करनवाल यांनी या दौऱ्यावेळी वंचित घटकातील विद्यार्थ्यांना वाटप केल्या.या वेळी या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा असा