किन्ही ग्रामसेविकेचा बदलीसाठी असाही प्रताप ;
जि. प. च्या सभेत गाजला मुद्दा, पल्लवी सावकारे यांचा आरोप
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेतील बदल्या थांबविण्यासाठी शासनाने बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांची खैरात वाटल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे यांनी केला असून किन्हीच्या ग्रमासेकव महिलेने तर चक्क बदलीच्या दिवशीच वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले, मात्र, आश्चर्य 27 जुलैच्या वैद्यकीय दाखला आणि 28 जुलैचे केसपेपर यातून मोठा घोळ असून जिल्हाशल्यशिकिसक यांचीच चौकशी करावी, अशी मागणी पल्लवी सावकारे यांनी केली. जिल्हा परिषदेच्या सभेत हा मुद्दा वादळी ठरला.
जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन सभेत शिक्षक ऑनलाईन बदलीसह विविध बदल्यांचा विषयावर वादळी चर्चा झाली. यावरून विरोधक व सत्ताधार्यांमध्ये तु तूू मै मै पाहण्यास मिळाली. संपूर्ण सभेत या मुद्यावर अत्यंत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यात किन्ही येथील ग्रामसेविका दहा वर्ष झाल्याने बदलीस पात्र होत्या. त्यांची बदली होणार होती. मात्र, त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून थेट बनावट प्रमाणपत्र व तेही थेट बदलीच्या दिवशीच सादर करून बदली रद्द केली. प्रशासनानेही ते मान्य कसे केले असा सवाल सावकारे यांनी प्रश्न उपस्थित केला. या महिला कर्मचारी एकही दिवस सुटीवर नव्हत्या मग आजारी कशा, त्यांच्या ईजीसी रिपोर्टवर कोणाचे नाव नाही, ऐवढी मोठी आरोग्याची समस्या नसताना त्या घरी का थांबल्या नाहीत शिवाय अधिकार्यांनी कसलीही तपासणी न करता यावर स्वाक्षर्या कशा केल्या. असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून अधिकार्यांना धारेवर धरले. दरम्यान, बदली प्रक्रियेतील मोठा घोळ समोर येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. अध्यक्षा रंजनापाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभेला शिक्षण सभापती रवींद्र पाटील, माजी सभापती पोपट भोळे, राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे, शिवसेना सदस्य नानाभाऊ महाजन, भाजपचे सदस्य मधु काटे, तरिक्त कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड, उपमु कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे आदी उपस्थित होते.
रॉयल्टीच्या विषयावर चौकशी होणारच – जिल्हाधिकारी
साठवण बंधार्यातून झालेल्या गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतूकीत कोट्यवधींचा घोळ समोर आलेला असून यावर कारवाई करावी, अशी मागणी पल्लवी सावकारे यांनी केली होती. यावर त्यांनी नुकतीच जिल्हाधिकार्यांची भेट दिली हेाती. त्यावर कारवाई होणारच असे आश्वासन त्यांनी दिले असून यात चौकशी समिती गठीत केली जाईल, असे जिल्हा परिषदेचे सीई डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले आहे. बदल्या थांबवा अशी मागणी करीत माजी सभापती पोपट भोळे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तेव्हा तुमचे अध्यक्ष असताना तेव्हा विरोध का केला नाही, असा सवाल सदस्य नानाभाऊ महाजन यांनी उपस्थित केला. त्यावर अध्यक्ष व उपाध्यक्ष आमचे ऐकत नाही, अशी खंत सावकारे यांनी बोलून दाखविली.