जळगाव;- येथील जुनी जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये आज सकाळी शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांच्या कार्यालयातील छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली . यात त्यांचे स्वीय सहाय्य्क कांतीलाल पाटील हे थोडक्यात बचावले . दरम्यान जिल्हा परिषदेची जुनी इमारत हि जीर्ण झाल्याने ती दुरुस्त करण्याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.