लखनौ ;- पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. मुलीची देखभाल करण्यासाठी सुट्टी मिळत नसल्याने उत्तर प्रदेशमधील एका पोलीस अधिकाऱ्याने राजीनामा दिल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीला कोरोनाची लागण झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या झाशीमधील सर्कल ऑफिसर (सीओ) मनीष चंद्र सोनकर यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना सोनकर यांनी आपली कोरोनाबाधित पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची देखभाल करण्यासाठी सुट्टी मिळत नसल्याचं कारण दिलं आहे.