जळगाव ;– के.सी.ई. सोसायटी संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. अभिवाचन, मराठी व्याकरण, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. उन्नती सोनवणे या विद्यार्थिनीने मराठी भाषेचे महत्त्व याविषयी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. किसन पाटील यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या वेळी समन्वयक चंद्रकांत भंडारी, मुख्याध्यापक डी. व्ही. चौधरी, पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे, ए. एन. पाटील, वर्षा राणे, डी. ए. पाटील, सतीश भोळे, आर. एन. तडवी उपस्थित होते. सी. बी. कोळी यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिभा लोहार यांनी मान्यवरांचे आभार मानले.








