जामनेर तालुक्यात खादगाव येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील खादगाव येथे एका ५० वर्षीय इसमाने टेकडीवर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
खादगाव येथे मृत दिनकर मधुकर सोनवणे (वय ५० रा. खादगाव ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी एका बँकेकडून गृहकर्ज घेतले होते. शुक्रवारी दि. १९ डिसेंबर रोजी बँकेचे वसुली कर्मचारी सोनवणे यांच्या घरी आले होते. यानंतर त्यांनी जामनेरच्यालगत एमआयडीसी परिसरात टेकडीजवळ एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयात मृत अवस्थेत दाखल केले, वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. याबाबत जामनेर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जयंत पगारे पुढील तपास करीत आहे.









