जळगाव ;- जिल्ह्यात शुक्रवारी दुपापर्यंत प्राप्त झालेल्या १०८ करोना चाचणी तपासणी अहवालापैकी ७८ अहवाल नकारात्मक आले आहेत. जिल्ह्यातील करोना रूग्णांची संख्या ३८१ पर्यंत पोहचली आहे.
भुसावळ, यावल, पाचोरा, जळगाव, एरंडोल येथील नमुना घेतलेल्या १०८ संशयितांच्या अहवालांपैकी ३० व्यक्तींचेअहवाल सकारात्मक आले आहेत. त्यात जळगावातील २६, भुसावळ येथील तीन तर एरंडोल येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोना बाधित संख्या ३८१ झाली असून १३३ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दरम्यान, टाळेबंदीचा कालावधी ३१ मेपर्यंत वाढविण्यात आल्याने जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यानुसार सायंकाळी सात ते सकाळी सात या वेळेत अनावश्यकरित्या फिरण्यास करण्यात आली आहे.