जळगाव (प्रतिनिधी) – युवासेना विस्तारक कुणाल दराडे युवासेनेच्या वतीने राज्यभर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेची जनजागृती करून या मोहिमेत सर्व नागरिकांना सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहेत. ते नुकतेच जामनेरला आले त्यावेळी त्यांचे युवासेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
तसेच युवासेनेचे पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व आदेशाने राज्यभर युवासेना वाढविण्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त देखील ते आले आहेत. जामनेर येथे आज शनिवारी २४ रोजी दुपारी 3 वाजल्याच्या सुमारास शहरात आगमन झाले. नगर परिषदे समोरील राजमाता जिजाऊ चौकात फटाके व ढोलताशांच्या गजरात भव्य स्वागत युवासेनेच्या वतीने करण्यात आले.
युवासेनेचे विस्तारक कुणाल दराडे यांच्या सोबत युवासेना विस्तारक किशोर भोसले, जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, विश्वजितराजे मनोहर पाटील, अँड. भरत पवार, पवन माळी, सुमित चव्हाण, अतुल सोनवणे, दीपक माळी, ज्ञानेश्वर जंजाळ, विशाल लामखेडे, भूषण ललवाणी, मेजर शिंदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते. या वेळी शिवसेनेत, युवसेनेत अनेकांनी प्रवेश केला.







