अहमदाबाद (वृत्तसंस्था) – सोमवारी गुजरात उच्च न्यायालयात चीफ जस्टीस विक्रम नाथ यांच्या कोर्टाच्या कारवाईची लाईव्ह स्ट्रीमिंगची सुरुवात करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उच्च न्यायालयानं हे पाऊल टाकलं आहे.
सर्वोच्च न्यायालयानं व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे जनतेला सुनावणी पाहण्याची परवानगी मिळायल हवी असं सांगितलं होतं. यासाठी उच्च न्यायालयाला याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यामुळं आजपासून जनताही गुजरात हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी होऊ शकते आणि सुनावणी ऐकू शकते. आता हायकोर्टाची ही सुनावणी युट्युबवर लाईव्ह पाहता येणार आहे.
उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जारी केल्यानुसार यात निरमा युनिव्हर्सिटी मधील लॉ चे विद्यार्थी पृथ्वीराज सिंह जाला यांच्या एका पीएलआयचाही उल्लेख आहे. कोर्टाच्या कारवाईच्या लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी सर्वोच्च न्यायालयानं निर्देश जारी करण्याची विनंती केली होती. पृथ्वीराज सिंह जाला आपल्या या विनंतीच्या आधारानं न्याय आणि ओपन कोर्टाच्या सिद्धांताचा हवाला दिला होता.
कोरोना महामारीच्या काळात सध्या उच्च न्यायालयापासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत व्हर्चुअल सुनावणी सुरू आहे. या व्हर्चुअल सुनावणी दरम्यान अनेक अशी महत्त्वाची प्रकरणं आहे ज्यावर वाद सुरू असल्याचं दिसत आहे आणि अनेक निर्णायांची सुनावणी करण्यात आली आहे. ही व्हर्चुअल सुनावणी सार्वजनिक करण्यात यावी अशी मागणी बऱ्याच काळापासून सुरू होती.