भडगांव ( प्रतिनिधी ) – महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील यांची अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन समितीच्या राज्य कार्यकारणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे .

महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समितीने महिला दक्षता समिती अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील यांची राज्य कार्यकारणी सदस्यपदी समितीचे राज्याध्यक्ष तथा मालेगांव परिमंडलचे विशेष पोलिस अधिकारी तानाजी शिंदे, उपाध्यक्ष रंजन खेरोटे, सचिव अमोल निकम यांनी नियुक्ति केली आहे.
नगरसेविका योजना पाटील सामजिक जनजागृती अभियान, महिला दक्षता समिती माध्यमातून निःश्वार्थ जनसेवा कार्यात अग्रेसर् असतात. सामजिक उपक्रमांर्गत अंधश्रद्धा निर्मूलन करून अनिष्ठ परंपरा दूर करणेसाठी त्यांच्या योगदानाची दख़ल घेत राज्य समितीने राज्य सदस्यपदी नियुक्ति केली आहे. समाजाभिमुख, श्रद्धा संवर्धनातील महाराष्ट्रातील एकमेव चळवळ असलेल्या या समितीच्या प्रबोधन सेवाकार्यास नियुक्तिने योजना पाटील यांचे अभिनंदन होत आहे.







