परवानगी नसताना केले रास्ता रोको
यावल (प्रतिनिधी) – येथील अंकलेश्वर ते ब-हाणपुर जाणारे रस्त्यावर सोमवार दि. २१ रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास परवानगी नसताना रास्ता रोको करण्यात आला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या कामकाजात अडथळा झाला म्हणून यावल पोलीस स्टेशनला निष्पन्न झालेल्या ६१ नावांसह १०० ते १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवार दि.२१ रोजी अर्जदार उस्मान रमजान तडवी, (रा. सावखेडासीम, ता. यावल) यांनी सावखेडासीम येथील ग्रामपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होवून संबंधीतांवर कारवाई करणे बाबत दि.१४ ऑगस्ट रोजीपासुन सुरु केलेल्या आमरण उपोषणाची अद्यापपावेतो दखल घेण्यासाठी कोणीही अधिकारी आलेले नाहीत. तसेच तालुक्यातील अधिकारी देखील दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे जो पर्यंत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आमच्या समस्या ऐकून घेण्यासाठी येणार नाहीत तो पर्यंत सोमवार दि. २१ रोजी ११ वाजता भुसावळ टि पॉईन्ट येथे रास्तारोको करण्याचे ठरविले. त्यानुसार अर्ज देण्यात आला. मात्र प्रतिबंधात्मक व जमाव बंदी आदेश लागु असल्याने सदर आदेशाच्या अधीन राहुन यावल पोलीस स्टेशनने नाकारला. नुसार नोटीस देण्यात आली होती व रास्ता रोको आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती.
तरीदेखील रास्ता रोको करण्यात आला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या कामकाजात अडथळा झाला म्हणून यावल पोलीस स्टेशनला निष्पन्न झालेल्या ६१ नावांसह १०० ते १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये पवन युवराज पाटील. रा. विरावली, हर्षल मिलींद महाजन, राहुल बडगुजर, संकेत निवृत्ती किरंगे, रा. सावखेडा सीम, रोहन दिनेश महाजन, तुषार शिरीष पाटील, धिरज प्रभाकर पाटील, देविदास गोविंदा पाटील, निलेश प्रमोद महाजन, शाकीर मुबारक तडवी,रा.सावखेडा, अमोल प्रेमचंद पाटील, दिपक ज्ञानेश्वर चौधरी, गिरीष लिलाधर बर्डे, तुषार खुशाल पाटील, कोमल नरेंद पाटील, सावखेडासीम, सुयोग किरण पाटील , ताहेर लतीफ तडवी, विशाल ज्ञानेश्वर पाटील, पराग प्रेमचंद पाटील, चंद्रकांत महाजन, गणेश शरद कोल्हे, पवन रामकृष्ण पाटील, वसंत राघो पाटील, अल्ताफ ईब्राहीम तडवी,रा. मनुदेवी मंदीराच्या मागे, यावल, गौरव भरत सोनवणे, रशीद रसुल तडवी, सलिम बि-हाम तडवी, मुकुंदा शांताराम पाटील, किरण पाटील, वासुदेव पाटील, विकी पाटील, प्रभाकर नारायण सोनवणे, वढोदा, ता. यावल, मुकेश पोपटराव येवले, रा. शिवाजीनगर, यावल, राकेश मुरलीधर कोलते, रा. महाजनगल्ली, यावल, कदीर खान करीम खान, रा. काझीपुरा,यावल, अनिल जंजाळे, रा. सिद्धार्थ नगर, यावल, संतोष बन्सी धोबी, यावल, बापु जासुद, रा. यावल, विक्की विजय गजरे, रा.यावल, अजय बाळु अडकमोल, रा. दहीगांव, विकास गणेश पाटील, रा. सांगवी खु।।, ता., अनिल प्रल्हाद पाटील, रा. कोळवद, सुनिल भालेराव, रा. सावखेडासिम, राजु महाजन, रा. यावल, धिरज प्रेमचंद कुरकुरे, रा. सातोद, उमेश जावळे, रा. कोरपावली, राजेश करांडे, शरद रंगु कोळी, कामराज रुपचंद घारु. खुशाल दिलीप पाटील, रा. बोरावल गेट, ईम्रान पहीलवान, रा. यावल, चंद्रकांत जंगले, रा. चितोडा, डॉ. विवेक अडकमोल, रा. बोरावल गेट, सुनिल (पप्पु) जोशी, रा. शनि मंदीर, विलास तायडे, निळे निशाण, ललीत पाटील,रा. दहीगांव, रहेमान खाटीक, रा. खाटीकवाडा, नईम शेख, रा. यावल, कडु पाटील, चितोडा, जितेंद्र वरडे, रा. सावखेडासिम, रविंद्र पोलाद सोनवणे, रा. वढोदा,ता.यावल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.