जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत वाळूमाफीया गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव प्रलंबित होता. या प्रस्तावावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी दि. ५ सप्टेंबर रोजी सही केली असून कोल्हापूर कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत ज्ञानेश्वर नामदेव तायडे उर्फ नाना कोळी (वय ३६, रा. कोळहावी ता. यावल) याच्यावर ९ गुन्हे दाखल आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी एमपीडीएचा प्रस्ताव तयार करून तो एलसीबीकडे पाठवला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे तो सादर करण्यात आला होता.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवार दि. ५ सप्टेंबर रोजी एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले असून त्याला कोल्हापूर येथील कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला आहे. प्रस्ताव तयार करणेकामी सपोनी मोताळे यांच्यासह तत्कालीन सपोनि निलेश वाघ, उपनिरीक्षक मैंन्नुद्दीन सय्यद, सहाय्यक फौजदार योगेंद्र मालविया, हेडकॉन्स्टेबल योगेश महाजन, समाधान पाटील, नावकर, अनिल पाटील यांनी कामकाज केले. नाना कोळी याला ताब्यात घेण्यात आले असून कोल्हापूर कारागृहाकडे कर्मचारी रवाना झाले आहेत.