यावल ( प्रतिनिधी ) – यावल ते किनगाव रोडवर ‘हॉटेल जलसा’शेजारी मोकळ्या जागेत बेकायदेशीर देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या तरूणाला फैजपूर पोलीसांनी अटक केली ८ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“यावल ते किनगाव रोडवर हॉटेल जलसा शेजारी मोकळ्या जागेत झाडाच्या आडोशाला संशयित आरोपी दीपक मधुकर माळी (वय-३७ , रा. फुले चौक मुजुमदार नगर, साखळी ता.यावल ) हा बेकायदेशीर देशी व विदेशी दारूची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती फैजूपर विभागचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळाली.
गुरूवारी दुपारी सहाय्यक फौजदार प्रमोद चौधरी, अविनाश चौधरी आणि पो कॉ सुमित बाविस्कर यांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले त्याच्याकडून ८ हजार ९०० रुपये किंमतीचा दारुचा मुद्देमाल हस्तगत केला पो कॉ सुमित बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात संशयित दिपक माळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.