यावल पोलीस ठाण्याचे आवाहन
यावल (प्रतिनिधी) : येथील पोलीस ठाण्याअंतर्गत अनेक दिवसांपासून विविध गुन्ह्यात,अपघातात व बेवारस स्थितीत मिळून आलेल्या तब्बल २५ दुचाकी जप्त केलेल्या आहेत. या सर्व २५ दुचाकी गेल्या १० ते १५ वर्षापासून पोलीस ठाण्यात पडून असलेल्या या दुचाकी वाहनांची पोलिसांनी विल्हेवाट करण्या संदर्भात कार्यवाही सुरू केली असुन सदर दुचाकींच्या मालक व त्याच्या वारसदारांनी आवश्यक कागदपत्र पोलिस ठाण्यात सादर करून आठ दिवसाच्या आत दुचाकी ताब्यात घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
यावल पोलीस ठाण्यात अंतर्गत विविध गुन्ह्यात अपघातात व इतर कामात दुचाकी वाहन बेवारस स्थितीत मोठ्या प्रमाणावर मिळून आलेले आहे. त्यातील गेल्या १० ते १५ वर्षांपासून २५ दुचाकी बेवारस स्वरूपात पडून आहेत. सदर दुचाकींची विल्हेवाट आता पोलिसांच्या वतीने लावण्याची तयारी केली जात आहे. म्हणून पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या वतीने सदर बेवारस दुचाकी मालकांना सूचना जाहीर करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसाच्या आत दुचाकीच्या मुळ मालकांनी आपल्या दुचाकी घेऊन जाव्यात तसे नाही केल्यास या संपुर्ण दुचाकी बेवारस समजून शासकीय नियमानुसार त्यांची विल्हेवाट लावली जाईल असे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.