जळगाव (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील खेडी कोरपावली येथील विवाहित नजमा कासम तडवी (वय-३०) हिने घरगुती भांडणावरून गुरुवारी दुपारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिचा शुक्रवारी २० रोजी उपचार सुरु असतांना मृत्यू झाला.
खेडी कोरपावली येथील रहिवासी विवाहित नजमा कासम तडवी (वय-३०) हिने गुरुवारी घरात भांडण झाल्यावर संतापाच्याभरात विष प्रश्न केले. तिला कुटुंबीयांनी पुढील उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचा शुक्रवारी २० रोजी उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. महिलेच्या पश्चात एक सहा वर्षीय मुलगी आहे. तिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.








