यावल (प्रतिनिधी ) – शौचास गेलेल्या एका १५ वर्षीय तरुणीवर दोन अल्पवयीन तरुणांनी अत्याचार केल्याची घटना तालुक्यात घडली असून या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे. याबाबत यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यात एक १५ वर्षीय तरुणी २६ जानेवारी रोजी शौचास गेली असता दोन जणांनी तिला एकटी हेरून तिचे तोंड दाबून तिच्यावर शेतामध्ये नेऊन आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली . अत्याचार केल्यानंतर दोघांनी तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मुलीने आपल्यावर अत्याचार झाल्याची माहिती कथन केली. पीडीत मुलीच्या फिर्यादीवरून गावातील दोन अल्पवयीन मुलांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहेत.