पाचोरा ;-. पाचोऱ्यातील साईमोक्ष क्वारंटाईन सेन्टर मध्ये रात्री उशिरा बांबरुड (राणीचे) येथील एका 33 वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.हा युवक 19 जुलै रोजी येथे दाखल झाला होता, त्याचे स्वब तपासणी साठी 20 रोजी घेण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. दरम्यान घटनास्थळी रात्री ३.३० च्या सुमारास प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे ,डॉ.अमित साळुंखे यांनी भेट देत पाहणी केली.सदर युवकावर शासकीय प्रोटोकाल प्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.युवकाने आत्महत्या का केली याचे निश्चित कारण समोर आले नसून पोलीस तपास करत आहेत मात्र या दुर्दवी घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.