मुंबई ( प्रतिनिधी ) – आतापर्यंत फक्त बिअर बार किंवा दारुच्या दुकानात मिळणारी वाईन पुढच्या काळात किराणा दुकानातही विक्रीला उपलब्ध असेल. दैनंदिन गरजेच्या वस्तू विकणाऱ्या सर्व दुकानात वाईनच्या विक्रीला सरकारनं परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय. वाईन महागण्याचीही शक्यता आहे. कारण वाईन आताकराच्या कचाट्यात असेल.
सरकारनं विदेशी मद्यावरचं आयातशुल्क कमी केलं. महाराष्ट्रात दारुच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. आता वाईनबद्दलही मोठा निर्णय सरकारनं घेतलाय. किराणा दुकानं, डिपार्टमेंटल स्टोअर्स तसच इतर ठिकाणीही वाईन उपलब्ध असेल.
इतर मद्यांच्या तुलनेत. राज्य सरकारला वाईनच्या माध्यमातून वर्षाला 5 कोटी रुपये टॅक्सच्या माध्यमातून मिळण्याची चिन्हं आहेत. सध्या महाराष्ट्रात वर्षाला 70 लाख लीटर वाईन घेतली जाते. त्यात ह्या नव्या धोरणामुळे 30 लाख लीटरची भर पडेल. वर्षाला 1 कोटी लीटरचा लोक आस्वाद घेतील असा सरकारचा अंदाज आहे.
विक्री करणाऱ्या दोन बारच्या दरम्यान 200 मीटरचं अंतर हवं अशी अटही आता हटवण्यात येईल. वाईनवर अबकारी कर म्हणून प्रत्येक लीटरला 10 रुपये असा जाहीर करण्यात आलाय. ह्या नव्या टॅक्समुळे मार्केटमध्ये नेमका किती माल आहे, किती घेतला जातोय, किती वाढणार याची आकडेवारी गोळा करायलाही मदत होईल. बिअर जशी कॅन आणि बॉटलमध्ये मिळते. तशी वाईनही मिळणार आहे.
देशात द्राक्षाचं सर्वाधिक उत्पन्न घेणारे दोन्ही जिल्हे महाराष्ट्रात आहेत. पहिला आहे नाशिक आणि दुसरा सांगली. याच द्राक्षांच्या जोरावर नाशिकसारख्या ठिकाणी वाईन इंडस्ट्री उदयाला आलीय दारु किंवा बिअर जेवढी ढोसली जाते तेवढा वाईनचा अजून खप नाही. अजून तरी ती थोडं उच्च मध्यमवर्गीय आणि त्यापुढच्या लोकांची पसंत आहे. वाईनचे दर हे खूप जास्त आहेत. त्याला कारण तिची क्वालिटी, तिला लागणारा काळ, ब्रँड अशा अनेक गोष्टी आहे.