जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी येथील घटना
जळगाव (प्रतिनीधी) :- शहरातील उस्मानिया पार्क, शिवाजीनगर भागातील रहिवासी २१ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्यु झाल्याची घटना आज दि. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

आवेश अली परवेज अली (वय-२१)असे मयत तरुणाचे नाव आहे. जळगाव शहरातील उस्मानीया पार्क परिसरात आवेश अली हा आई-वडील, मोठा भाऊ आणि दोन बहिणींसह वास्तव्यास होता. आवेशचे आयटीआय शिक्षण झाले होते. तो, नियमीत ऐसी,फ्रिज रिपेरींगची कामे देखील करत होता. मात्र, सलग तीन दिवस काम नसल्याने त्याने सुटी टाकून तो, वेल्डींग दुकानावर कामासाठी सुप्रीम कॉलनी येथे गेला होता. वेल्डींगचे काम सुरु असतांना दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक त्याचा पाय उघड्या विद्युत वायरवर पडल्याने विजेचा जबर धक्का लागून तो बेशुद्ध झाला. तत्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मयत घोषीत केले. कुटूंबीयांनी एकच आक्रोश करत हंबरडा फोडला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.









