जळगाव शहरातील घटना
निलेश हेमराज सराफ (वय-४९, रा. अजय कॉलनी, रिंगरोड, जळगाव) हे खाजगी व्यवसाय करून ते उदरनिर्वाह करतात. दरम्यान गुरुवारी ९ ऑक्टोबर रोजी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या व्हाट्सअप क्रमांकावर एक कस्टमर सर्विस सपोर्ट असे नावाचे APK फाईल पाठवली. त्यानंतर यूपीआयच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातून ४ लाख ६४ हजार ४३९ रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
यासंदर्भात निलेश सराफ यांनी शनिवारी ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे करीत आहे.