अमळनेर शहरातील मध्यवर्ती भागातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या रसवंती दुकानातील ग्राहकांच्या वादाच्या कारणावरून एकाला दोन जणांनी शिवीगाळ करत लोखंडी पाईपाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी दि.२२ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी २५ एप्रिल रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश सुरेश शिंदे (वय ४५ रा. जोशीपूरा अमळनेर) हे कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्यांचे बसस्थानक आवारात रसवंती दुकान आहे. त्यांच्या दुकानाच्या बाजूला देखील दशरथ नथ्थू शिंदे यांचे देखील रसवंतीचे दुकान आहे. दरम्यान २२ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता व्यावसायिक स्पर्धेतून दशरथ नथ्थू शिंदे आणि त्याचा मुलगा नयनराज दशरथ शिंदे दोन्ही (रा. जोशीपूरा, अमळनेर) या दोघांनी योगेश शिंदे याला शिवीगाळ करून डोक्यात लोखंडी रॉड टाकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.
जखमी झालेल्या योगेश शिंदे यांना अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी गुरूवारी २५ एप्रिल रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार मारहाण करणारे दशरथ नथ्थू शिंदे आणि त्याचा मुलगा नयनराज दशरथ शिंदे दोन्ही रा. जोशीपूरा, अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामेदव बोरकर हे करीत आहे.