जामनेर तालुक्यातील
सोनाळा गाव ते सोनाळा फाटा दरम्यानची घटना
जामनेर ( प्रतिनिधी ) – सोनाळा येथून मोटारसायकलवर पहुरला जात असलेल्या कापसाच्या व्यापाऱ्याला अज्ञात चार गुंडांनी चाकु, बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडील ७ लाख रुपये हिसकावून नेल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली .
जामनेर तालुक्यातील सोनाळा येथील संजय रामकृष्ण पाटील हे पहूर येथे कपाशीचा व्यापार करतात आज ते नेहमीप्रमाणे सकाळी सोनाळा येथून पहुरकडे मोटरसायकलने येत असताना सोनाळा गाव ते सोनाळा फाटा दरम्यान फॉरेस्ट तलावाजवळ अज्ञात चार जणांनी चाकु, बंदुकीचा धाक दाखवून सात लाख रुपये हिसकावुन घेतल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.
सोनाळा येथून हे अज्ञात संशयित त्यांचा पाठलाग करीत होते दोन जण तलावाजवळ आधीच थांबलेले होते दोन जणांनी संजय पाटील यांना धमकावत सात लाख रुपये हिसकावून घेतले पहूर पोलिस ठाण्यात संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा – जामनेर विभागाचे पोलीस उपाधीक्षक भारत काकडे व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. व तपासकामी काही पथके रवाना करण्यात आली आहे.